जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या!
By Admin | Updated: April 13, 2017 01:45 IST2017-04-13T01:45:58+5:302017-04-13T01:45:58+5:30
अकोला : शासनाने केलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील तीन तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत.

जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या!
अकोला : शासनाने केलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील तीन तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत.
त्यामध्ये अकोला येथील प्रभारी खनिकर्म अधिकारी डॉ. आर.जी.पुरी यांची पातूर तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे. पातूरचे तहसीलदार राजेश वझिरे यांची वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे तर जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्भय जैन यांची अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तहसीलदारपदी बदली झाली आहे. मूर्तिजापूरचे तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांची अमरावती येथे तर त्यांच्या जागेवर दर्यापूरचे तहसीलदार राहुल तायडे यांची बदली झाली आहे. शासनाने तहसीलदारांच्या बदल्यांचा आदेश काढल्याने आता मे पूर्वीच बदल्यांचा पोळा फुटण्याची शक्यता आहे.