सहा महिन्यांत ‘स्वाइन फ्लू’चे २0 बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:36 IST2017-09-07T01:35:51+5:302017-09-07T01:36:21+5:30

अकोला : स्वाइन फ्लू या अत्यंत घातक व संसर्गजन्य  आजाराने जिल्हय़ातही प्रवेश केला असून, हळूहळू  त्याचा विळखा घट्ट होत आहे. या आजाराने  खासगी  इस्पितळात उपचार घेत असलेल्या आणखी दोघांचा  शनिवारी मृत्यू झाल्याने मार्च २0१७ ते ६ सप्टेंबर  २0१७ या कालावधीत जिल्हय़ात स्वाइन फ्लूच्या  बळींची संख्या २0 वर पोहोचली आहे. या  कालावधीत १४८ संशयित रुग्ण आढळून आले  असून, त्यापैकी ८२ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे  निष्पन्न झाले आहे.  

Swine Flu 20 victims in six months | सहा महिन्यांत ‘स्वाइन फ्लू’चे २0 बळी!

सहा महिन्यांत ‘स्वाइन फ्लू’चे २0 बळी!

ठळक मुद्देअकोला जिल्हय़ात ‘स्वाइन’ची धास्ती कायम ८२ रुग्ण पॉझिटिव्ह,  १४८ संशयित

अतुल जयस्वाल। 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : स्वाइन फ्लू या अत्यंत घातक व संसर्गजन्य  आजाराने जिल्हय़ातही प्रवेश केला असून, हळूहळू  त्याचा विळखा घट्ट होत आहे. या आजाराने  खासगी  इस्पितळात उपचार घेत असलेल्या आणखी दोघांचा  शनिवारी मृत्यू झाल्याने मार्च २0१७ ते ६ सप्टेंबर  २0१७ या कालावधीत जिल्हय़ात स्वाइन फ्लूच्या  बळींची संख्या २0 वर पोहोचली आहे. या  कालावधीत १४८ संशयित रुग्ण आढळून आले  असून, त्यापैकी ८२ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे  निष्पन्न झाले आहे.  
राज्याच्या विविध भागात धुमाकूळ घालणार्‍या स्वाइन  फ्लूने अनेकांचे बळी घेतले असून, या आजाराची  धास्ती सर्वत्र कायम आहे. श्‍वसन यंत्रणेशी संबंधित  असलेला हा आजार एच १ एन १ या अत्यंत घातक  विषाणूंमुळे होतो. हवेच्या माध्यमातून हा विषाणूचा  प्रसार होत असल्यामुळे एका रुग्णापासून दुसर्‍याला  या आजाराची लागण होते. या विषाणूंचा प्रसार  रुग्णांच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम,  त्याची थुंकीमधून होतो. अकोल्यात यावर्षी मार्च  महिन्यात स्वाइन फ्लूचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आला. तेव्हापासून या आजाराने डोके वर  काढले असून, आतापर्यंत २0 जणांचा या संसर्गजन्य  आजाराने बळी घेतला आहे. मार्च ते ६ सप्टेंबर  २0१७ या कालावधीत १४८ संशयित रुग्ण आढळून  आले असून, त्यापैकी ८२ जणांना स्वाइन फ्लू  झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी ६२ रुग्ण एक  तर बरे झाले आहेत किंवा त्यांच्यावर शहरातील  खासगी रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयात उपचार सुरू असल्याची नोंद आरोग्य  विभागाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वाइन  फ्लूचा प्रसार झपाट्याने होत असल्याने नागरिकांमध्ये  दहशतीचे वातावरण आहे.

आणखी दोन दगावले; नऊ रुग्णांवर उपचार सुरू
स्वाइन फ्लू या आजारामुळे शनिवार, २ सप्टेंबर रोजी  एक महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती  समोर आली आहे. सद्यस्थितीत शहरातील खासगी  इस्पितळं आणि सवरेपचार रुग्णालयात स्वाइन  फ्लूसदृश लक्षणे आढळून आलेल्या ९ रुग्णांवर उ पचार सुरू आहेत. यापैकी ६ रुग्णांना स्वाइन फ्लू  झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचा अहवाल  पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित तीन रुग्ण संशयित  असून, त्यांचे स्वॉब तपासणीसाठी नागपूर येथील  प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले  आहेत. या सर्व रुग्णांवर टॅमी फ्लू उपचार सुरू  करण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
-

Web Title: Swine Flu 20 victims in six months