‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’;‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 01:30 PM2019-08-20T13:30:58+5:302019-08-20T13:31:03+5:30

शहरांमधील किळसवाणे चित्र पाहता ‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

Swach Survekshan: credibility of 'QCI' jeopardized | ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’;‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’;‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात

Next

अकोला: राज्यात स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१९’ आणि आता ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ अंतर्गत महापालिका, नगर परिषद, नगर पालिकांमधील स्वच्छतेच्या कामांचे मूल्यमापन केले जात आहे. सदर मूल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटीच्या आधारावर अपेक्षित आहे. याकरिता केंद्र शासनाच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया) मार्फत शहरांची तपासणी केल्याचे दावे केले जात असतानाच प्रत्यक्षात शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य, ठिकठिकाणी तुंबलेला कचरा तसेच उघड्यावर शौचास बसणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरांमधील किळसवाणे चित्र पाहता ‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ तसेच स्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत महापालिका, नगर परिषद, नगर पालिकांमधील स्वच्छतेच्या कामांच्या मूल्यमापनाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आहे. सदर मूल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटीच्या आधारावर अपेक्षित आहे. संबंधित स्वायत्त संस्थांचे ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१८’ अंतर्गत मूल्यापन करण्यात आले होते. राज्यातील सर्व शहरांची कामगिरी उच्चतम होण्यासाठी शहरांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून शासनाने बक्षीस योजना जाहीर केली होती. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत स्वच्छ सर्वेक्षण -२०१८ मध्ये राज्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली होती. अभियानच्या पहिल्या टप्प्यात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना मनाई करून त्यांच्या घरी वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आले होते. त्यानंतर वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांची तपासणी करणे, मोकळ््या मैदानांची पाहणी करण्यासह शहरातील सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया) मार्फत तपासणी करण्यात आली. क्यूसीआयच्या अहवालानुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्था केंद्र व राज्य शासनाच्या प्रोत्साहनपर बक्षिसाकरिता पात्र ठरल्या होत्या.

पुन्हा एकदा घाणीचे साम्राज्य
‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ नुसार राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार स्वायत्त संस्थांनी काम सुरू केले असले तरी प्रत्यक्षात शहरांमध्ये साचलेला कचरा, उघड्यावर शौच करणाºयांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे ‘क्यूसीआय’च्या तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

 

Web Title: Swach Survekshan: credibility of 'QCI' jeopardized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.