शहरात ३२४ दुकानदार, कामगारांचे घेतले स्वॅब नमुने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST2021-03-01T04:21:32+5:302021-03-01T04:21:32+5:30

अकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अकोला शहरातील व्यापारी, दुकानदार व त्यांच्याकडील कामगारांची कोविड चाचणी करण्याची विशेष मोहीम ...

Swab samples taken from 324 shopkeepers and workers in the city! | शहरात ३२४ दुकानदार, कामगारांचे घेतले स्वॅब नमुने!

शहरात ३२४ दुकानदार, कामगारांचे घेतले स्वॅब नमुने!

अकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अकोला शहरातील व्यापारी, दुकानदार व त्यांच्याकडील कामगारांची कोविड चाचणी करण्याची विशेष मोहीम प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये रविवारी शहरातील ३२४ दुकानदार व कामगारांचे स्वॅब नमुने घेण्यात आले.

गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. त्यानुषंगाने कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये अकोला शहरातील व्यापारी, दुकानदार व त्यांच्याकडील कामगारांची कोविड चाचणी करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये रविवार, २८ फेब्रुवारी रोजी अकोला शहरातील दवा बाजार आणि विदर्भ चेंबरमध्ये दुकानदार व कामगारांची कोविड चाचणी घेण्यात आली. ३२५ दुकानदार व कामगारांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक व अकोला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत स्वॅब नमुने घेण्यात आले, असे अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी डाॅ.निलेश अपार यांनी सांगितले.

Web Title: Swab samples taken from 324 shopkeepers and workers in the city!