सेवानवृत्त एएसआयचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: July 22, 2014 00:35 IST2014-07-22T00:35:35+5:302014-07-22T00:35:35+5:30
सेवानवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक त्यांच्या घरात रविवारी २.३0 वाजताच्या सुमारास संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळून आले.

सेवानवृत्त एएसआयचा संशयास्पद मृत्यू
अकोला: कौलखेड परिसरात राहणारे सेवानवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक त्यांच्या घरात रविवारी २.३0 वाजताच्या सुमारास संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळून आले. दक्षतानगरामध्ये राहणारे संजय सोनाप्पा खताडे (४५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कौलखेड भागात प्राजक्ता कन्या शाळेजवळ राहणारे नारायण काकड (५५) यांनी पोलिस खात्यातून स्वेच्छानवृत्ती घेतली होती. गत तीन वर्षांपासून कौलखेड भागात एकटे राहत होते. रविवारी ते मृतावस्थेत घरात पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खदान पोलिसांनी रविवारी रात्री घरी जाऊन पाहणी केली असता, त्यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वीच झाल्याचे निष्पन्न झाले. काकड मरण पावल्याची बाब कुणाच्याच लक्षात आली नाही. त्यामुळे मृतदेहाला दुर्गंधी सुटली होती. नवृत्त एएसआय काकड यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला; परंतु त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूमागील कारण कळेल. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.