निलंबित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: April 30, 2017 03:05 IST2017-04-30T03:05:21+5:302017-04-30T03:05:21+5:30
लाच प्रकरणात रंगेहाथ पकडल्यानंतर निलंबित झालेल्या एका डॉक्टरने राहत्या घरात आग लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

निलंबित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न
अकोला - अमरावती येथे कार्यरत असलेले तसेच लाच प्रकरणात रंगेहाथ पकडल्यानंतर निलंबित झालेल्या एका डॉक्टरने राहत्या घरात आग लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी घडला असून, रामदास पेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे या डॉक्टरचे प्राण वाचविण्यात यश आले. रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत रहिवासी असलेले एक ३६ वर्षीय डॉक्टर अमरावती येथे वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर आरोग्य खात्याने डॉक्टरच्या निलंबनाचा आदेश काढला. डॉक्टर निलंबित झाल्यानंतर त्यांची मानसिक स्थिती ठिक नसून, ते प्रचंड दडपणात आहेत. अशातच घरी एकटे असताना या डॉक्टरने शनिवारी आत्महत्येचा प्रयत्न केला.