आरोग्यसेवक निचळ निलंबित

By Admin | Updated: April 2, 2017 03:02 IST2017-04-02T03:02:01+5:302017-04-02T03:02:01+5:30

गर्भपात गोळ्यांची अवैध विक्री प्रकरण

Suspend the healthcare nil | आरोग्यसेवक निचळ निलंबित

आरोग्यसेवक निचळ निलंबित

अकोला, दि. १- गर्भपाताच्या गोळ्या अवैधपणे विकताना रंगेहात पकडला गेलेला आरोग्यसेवक सुनील निचळ याला मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी शनिवारी निबंलित केले. गर्भलिंग निदान करणार्‍या रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी गठित जिल्हास्तरीय विशेष पथकाने सोमवारी गर्भपाताच्या गोळय़ा अवैधरीत्या विकताना रंगेहात पकडले होते. जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील आरोग्यसेवक सुनील निचळ आरोग्य केंद्रात गर्भपातासाठी वापरल्या जाणार्‍या ह्यमिसोक्रास्टह्ण या गोळय़ा अवैधरीत्या विकत असल्याची निनावी तक्रार प्राप्त झाली होती. वैद्यकीय ज्ञान असल्यामुळे औषधांच्या दुकानांमधून कमी पैशांमध्ये मिसोक्रास्टच्या गोळय़ा पाच हजार रुपये घेऊन विकत होता. या गोळय़ांच्या सेवनाने १२ आठवड्यांपर्यंंतचा गर्भपात होऊ शकतो, यामुळे अनेकजण त्याच्याकडून गोळय़ा घेत होते. तक्रारीवरून पथकाने सोमवारी सापळा रचला. डमी ग्राहक म्हणून गर्भपाताच्या गोळय़ांची मागणी केली. डमी ग्राहकाला गोळय़ा देत असतानाच निचळला पथकातील सदस्य व पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याला रामदासपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी त्याला निलंबित केले.

Web Title: Suspend the healthcare nil