गाेपाल अग्रवाल हत्याकांडातील संशयितांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST2020-12-29T04:17:40+5:302020-12-29T04:17:40+5:30

चार जण ताब्यात असल्याची चर्चा गाेपाल अग्रवाल यांच्या हत्याकांड प्रकरणात चार जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा जाेरात आहे. यामध्ये ...

Suspects in Gaepal Agarwal murder case | गाेपाल अग्रवाल हत्याकांडातील संशयितांची झाडाझडती

गाेपाल अग्रवाल हत्याकांडातील संशयितांची झाडाझडती

चार जण ताब्यात असल्याची चर्चा

गाेपाल अग्रवाल यांच्या हत्याकांड प्रकरणात चार जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा जाेरात आहे. यामध्ये गाेपाल अग्रवाल यांचे माेबाइलवरून लाेकेशन देणारा, दुसरा आराेपीला घेऊन जाणारा आणि गाेपाल अग्रवाल यांच्या मागावर असलेल्या दाेघांनाही पाेलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, पाेलिसांकडून या वृत्ताला अधिकृत दुजाेरा देण्यात आला नाही. साेमवारी या घटनेतील आराेपींचा चेहरा समाेर येणार असल्याची माहिती आहे.

काेट

गाेपाल अग्रवाल यांच्यावर गाेळ्या झाडून त्यांची हत्या करणाऱ्या आराेपींच्या मुसक्या लवकरच आवळण्यात येणार आहेत. पाेलीस आराेपींच्या मागावर असून मुख्य आराेपीस २४ तासांत बेड्या ठाेकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, या हत्याकांडाचा उलगडा लवकरच करण्यात येणार आहे. संशयितांची झडती सुरू आहे.

जी. श्रीधर

पाेलीस अधीक्षक, अकाेला

फाेटाे घेणे

Web Title: Suspects in Gaepal Agarwal murder case