शहरात घातपात घडविण्याचा संशय, तिघांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी
By नितिन गव्हाळे | Updated: September 6, 2023 20:24 IST2023-09-06T20:24:16+5:302023-09-06T20:24:26+5:30
परप्रांतातून आणल्या होत्या धारदार तलवारी

शहरात घातपात घडविण्याचा संशय, तिघांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी
अकोला: खदान पोलिस स्टेशन हद्दीतील मोमीनपुरा येथील एका घरातून सोमवारी उशिरा रात्री खदान पोलिसांनी परप्रांतातून आणलेल्या धारदार सहा तलवारींचा अवैध शस्त्रसाठा हस्तगत केला होता. सण, उत्सवाच्या पृष्ठभूमिवर घातपात घडविण्याच्या उद्देशाने हा शस्त्रसाठा शहरात आणल्याचा संशय पोलिसांना आहे.
त्या दिशेन खदान पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणातील तिघांना बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. खदानचे ठाणेदार धनंजय सायरे यांना मोहम्मद साबीर (रा. खैर मोहम्मद प्लॉट), शाहरुख शेख मुसिर (खदान), समीर खान नासिर खान (इस्लाम चौक खदान) यांनी राजस्थानातून धारदार तलवार आणल्याची माहिती मिळाली.
डीबी पथकातील पोलिस कर्मचारी विजय चव्हाण, रविराज डाबेराव, नितीन मगर, रोहित पवार यांनी मोमिनपुऱ्यात छापा घालून एका घरातून सहा तलवार जप्त केल्या आणि आरोपींना अटक केली. कावडयात्रा, ईद, गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमिवर शहरात घातपात घडविण्याच्या उद्देशाने आरोपींनी तलवारी आणल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने खदान पोलिस तपास करीत आहेत.