वाळू घाटांचे सर्वेक्षण, लिलाव प्रक्रिया लागणार मार्गी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:09+5:302021-06-18T04:14:09+5:30
अकोला : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत वाळू घाटांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून, वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया वेळेत सुरू करण्याचे ...

वाळू घाटांचे सर्वेक्षण, लिलाव प्रक्रिया लागणार मार्गी!
अकोला : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत वाळू घाटांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून, वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया वेळेत सुरू करण्याचे निर्देश अमरावती विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी बुधवारी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना (आरडीसी) दिले. त्यामुळे यंदा विभागातील वाळू घाटांचे सर्वेक्षण आणि लिलाव प्रक्रिया वेळेत मार्गी लागणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत वाळू घाटांचे सर्वेक्षण आणि ऑनलाइन लिलावाची प्रक्रिया रेंगाळली होती. गत नोव्हेंबरअखेरपर्यंत वाळू घाटांच्या लिलावास राज्य पर्यावरण समितीमार्फत मान्यता देण्यात आली होती आणि त्यानंतर मार्चअखेरपर्यंत वाळू घाटांची ऑनलाइन लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे वाळू घाटांच्या लिलावांतून कमी महसूल प्राप्त झाला होता. या पार्श्वभूमीवर वाळू घाटांचे सर्वेक्षण आणि लिलावाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अमरावती विभागीय आयुक्तांनी १६ जून रोजी विभागातील पाच जिल्ह्यांतील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. त्यामुळे यावर्षी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत वाळू घाटांचे सर्वेक्षण आणि लिलावाची प्रक्रिया वेळेत मार्गी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
वाळू घाटांचे सर्वेक्षण तातडीने सुरू करून, वाळू घाटांचे लिलाव करण्याची प्रक्रिया वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश अमरावती विभागीय आयुक्तांनी विभागातील पाचही जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी अमरावती येथे झालेल्या बैठकीत दिले. त्यानुसार जिल्ह्यात वाळू घाटांचे सर्वेक्षण आणि लिलावाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे.
- संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.