काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ; पण..
By Admin | Updated: September 10, 2014 01:44 IST2014-09-10T01:44:56+5:302014-09-10T01:44:56+5:30
भारिप-बमसंची पत्रकार परिषद; पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.

काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ; पण..
अकोला : महापौरपदासाठी काँग्रेसला पाठिंबा न देण्याच्या भूमिकेवरून भारिप-बमसंच्या पदाधिकार्यांनी ऐन निवडणुकीच्या पूर्वसंध्येला घूमजाव केले. काँग्रेसने नगरसेविका साफिया खातून आझाद खान यांचे नाव निश्चित केल्यास महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका पक्षाचे डॉ. रहेमान खान यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी मनपातील भारिपचे गटनेता, समन्वयक तसेच एकही नगरसेवक उपस्थित नव्हते, हे येथे उल्लेखनीय.
सत्तापक्ष काँग्रेसने अडीच वर्षाच्या कालावधीत सभागृहात भारिप-बमसंला सहकार्य न केल्यामुळे शहराचा विकास रखडला. काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे सर्वसामान्यांमध्ये भारिपची प्रचंड बदनामी झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत कोणत्याही परिस्थि तीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न करण्याची भूमिका भारिप-बमसंचे गटनेता गजानन गवई यांनी जाहीर केली होती. अवघ्या तीनच दिवसात भारिपने निर्णयात बदल करीत अटी व शर्तींंचा पेटारा उघडल्याने पक्षाचे धोरण स्पष्ट नसल्याचे समोर आले. काँग्रेस नगरसेविका साफिया खातून आझाद खान यांना महापौरपदाची उमेदवारी दिल्यास त्यांना मतदान करण्याची भूमिका भारिप-बमसंच्यावतीने डॉ. रहेमान खान यांनी मांडली.