शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बालकांना धान्य, तेलाचा कमी प्रमाणात पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:42 IST

चौकशी अहवाल राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांना पाठविण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सहा वर्षे वयोगटातील बालके, स्तनदा माता, गर्भवतींचे कुपोषण टाळण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने महाराष्ट्र कंझ्युमर्स को-आॅप. फेडरेशनकडून तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेल्या कच्च्या धान्याच्या पुरवठ्यात ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यात उघड झाला आहे. त्याचा चौकशी अहवाल राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांना पाठविण्यात आला आहे. त्यावर कोणती कारवाई झाली, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.पावसाळ्यात बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते. बालमृत्यूची संख्याही प्रचंड वाढते. आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभागासाठी बालमृत्यू आव्हानात्मक ठरतात. राज्यातील कुपोषित बालकांची ही संख्या गृहीत धरून त्यांच्यासाठी पोषण आहार पुरवठा केला जातो; मात्र त्या पुरवठा प्रक्रियेलाच कीड लागलेली आहे. बालकांचा आहार त्यांच्यापर्यंत ठरलेल्या वेळापत्रकानुसार न पोहोचणे, पुरवठादारांकडून ठरलेल्या गुणवत्तेचा आहार न मिळणे, यासारखे प्रकार सातत्याने घडत आहेत. कुपोषणग्रस्ततेचा डाग पुसून माता-बालमृत्यू रोखणे, बालकांना सुदृढ आरोग्याची हमी देण्यासाठी शासनाकडून राबविल्या जाणारा पोषण आहार पुरवठा योजनेचा सातत्याने बट्ट्याबोळ केला जात आहे. या प्रकाराच्या अनेक तक्रारी तसेच नमुनेही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमक्ष सादर करण्यात आले. त्यापैकी हळद, मिरची पावडरच्या नमुन्यात लाकडी भुसा असल्याचे दिसून आले. मिरची पावडर मटकी, चवळीमध्ये टाकल्यास त्याचा रंग काळाकुट्ट होतो. पुरवठादाराकडून सुरू असलेल्या कच्च्या धान्याचा पुरवठा निकृष्ट आहे. भेसळयुक्त वस्तूंमुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने चौकशी करण्यात आली. त्यामध्ये घोळ असल्याचे उघड झाले आहे.तेलाच्या वजनात ४५ ग्रॅमची तफावतमहाराष्ट्र कंझ्युमर्स को-आॅप. फेडरेशन आणि एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त यांच्यात झालेल्या करारनाम्यानुसार सोयाबीन तेल ५०० ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये देणे बंधनकारक आहे; मात्र महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या चौकशीत तेल ५०० मिली असून, त्याचे वजन ४५५ ग्रॅम आहे. त्यामुळे फेडरेशनकडून ४५ ग्रॅम कमी प्रमाणात तेलाचा पुरवठा केला जात आहे.

प्रमाणित वस्तूंचा पुरवठा करण्याला फाटाकंझ्युमर्स फेडरेशनकडून एगमार्क प्रमाणित वस्तूंचा पुरवठा करणे बंधनकारक असताना कोणतीही वस्तू त्या प्रमाणकाची पुरवठा झालेली नाही. त्यामुळे पुरवठा होत असलेल्या वस्तूंच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घोटाळ्याकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बालकांच्या आरोग्याशी खेळणाºया पुरवठादारावर कारवाई करण्याची गरज आहे.कच्च्या धान्यासाठी ६,३०० कोटींचा खर्चगरोदर, स्तनदा माता, बालकांच्या आरोग्यासाठी सर्वच प्रकारच्या पोषण आहार पुरवठ्यावर महिला व बालकल्याण व विभागाकडून वर्षभरात ६,३०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक निधी खर्च होत असताना राज्यातील ७८ हजारांपेक्षाही अधिक मुलांचे बालपण कुपोषणाने करपल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या अहवालात आहे.

टॅग्स :Akolaअकोला