मूर्तिजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुनील पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:19 IST2021-03-10T04:19:22+5:302021-03-10T04:19:22+5:30

संत गाडगे बाबा सभागृहात पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे यांनी अपक्ष नगरसेवक सुनील महादेवराव पवार यांची नगर ...

Sunil Pawar as Deputy Mayor of Murtijapur Municipal Council | मूर्तिजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुनील पवार

मूर्तिजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुनील पवार

संत गाडगे बाबा सभागृहात पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे यांनी अपक्ष नगरसेवक सुनील महादेवराव पवार यांची नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी साहायक पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी विजय लोहकरे, प्रशासन अधिकारी निशिकांत परळीकर उपस्थित होते. सभेला नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे, नगरसेवक विनायक गुल्हाने, सचिन देशमुख, भारत जेठवाणी, ममता महाजन, प्रतीक्षा वसुकार, वैभव यादव, प्रशांत डाबेराव, आलिया तब्बसुम नासीरोददीन, मनुबाई तानकर, अफरोजाबी अ.कलाम, सुनीता गुल्हाने, तसलीमखाँ बिसमिल्लाखाँ, कविता गुल्हाने, लक्ष्मी देवीदास गोळे, आशिष बरे, धनश्री भेलोंडे, रविंद्र इंगळे, अनिसाबी शेख खलील, सरिता पाटील, स्नेहा नाकट, मंदाताई जळमकर, संगीता गुल्हाने, सुनील लशुवाणी, इब्राहिम घाणिवाला आदी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

फोटो:

Web Title: Sunil Pawar as Deputy Mayor of Murtijapur Municipal Council