दहीगाव गावंडे येथील युवतीची आत्महत्या
By Admin | Updated: March 4, 2017 02:38 IST2017-03-04T02:38:57+5:302017-03-04T02:38:57+5:30
अन्वी मिर्झापूर शेतशिवारात आत्महत्या; आकस्मिक मृत्यूची नोंद.

दहीगाव गावंडे येथील युवतीची आत्महत्या
बोरगाव मंजू (जि. अकोला),दि. ३- पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दहीगाव गावंडे येथील २0 वर्षीय तरुणीने अन्वी मिर्झापूर शेतशिवारात आत्महत्या केल्याची घटना ३ मार्च रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्राप्त माहितीनुसार, अन्वी मिर्झापूर येथील रमेश सोनोने हे शुक्रवारी सकाळी आपल्या शेतात गेले असता, त्यांना एका २0 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला. त्यांनी याविषयी बोरगाव मंजू पोलिसांना माहिती दिली. हे.काँ. अरुण गावंडे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला, तसेच आणखी चौकशी केली असता सदर मृतदेह हा दहीगाव गावंडे येथील संगीता रघुनाथ डाबेराव या युवतीचा असल्याचे समोर आले.