शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 19:25 IST2017-09-11T19:25:15+5:302017-09-11T19:25:51+5:30
बाळापूर : स्थानिक नवानगर परिसरातील एका शेतकर्याच्या मुलाने १0 सप्टेंबर रोजी स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देबाळापूरातील नवानगर परिसरातील घटनाशेतातील झाडाला गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : स्थानिक नवानगर परिसरातील एका शेतकर्याच्या मुलाने १0 सप्टेंबर रोजी स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
नवानगरातील गोपाल दडी यांचा एकुलता एक मुलगा भूषण गोपाळराव दडी याने रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दडी यांच्याकडे चार एकर शेतजमीन आहे. त्यांच्या तीन मुली लग्नाच्या असून, त्यापैकी एक दिव्यांग आहे. तीन बहिणींच्या पाठीवर भूषण जन्मला होता. त्याने आत्महत्या का केली, ते समजू शकले नाही. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.