पातुरातील भूमिहीन शेतमजुराने गळफास घेऊन केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 20:22 IST2017-10-05T20:16:44+5:302017-10-05T20:22:54+5:30

पातुरातील भूमिहीन शेतमजुराने गळफास घेऊन केली आत्महत्या
ठळक मुद्देमृतक कैलास तायडे पातुरातील धनगरपुर्यातील रहिवासी राहत्या घरात नायलॉन दोरीने घेतला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : पातुरातील धनगरपुर्यातील रहिवासी कैलास रामदास तायडे (३८) याने ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्याच्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत असे.
त्याच्या पश्चात आई, पत्नी दोन मुली, मुलगा असा आप्त परिवार आहे. त्याच्या अंगावर बचत गटाचे कर्ज होते. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोल्यास रवाना करण्यात आला असून, आत्महत्येचे कारण वृत्त लिहिपर्यंत कळू शकले नाही.