युवा शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: April 15, 2016 02:24 IST2016-04-15T02:24:43+5:302016-04-15T02:24:43+5:30
विवाहाच्या आठ दिवसांपूर्वीच कवटाळले मृत्यूला.

युवा शेतक-याची आत्महत्या
वाशिम: कर्जाची परतफेड करणे अशक्यप्राय असल्याने नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या संदीप कव्हर या युवा शेतकर्याने त्याचा विवाह आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना सावरगाव बर्डे शेतशिवारात १४ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
तामसी (ता.जि.वाशिम) येथील युवा शेतकरी संदीप कव्हर याने ग्रामीण बँक व खासगी सावकाराकडून दोन लाखाच्या जवळपास कर्ज घेतले होते. त्याचे मांगूळ झनक (ता.रिसोड जि. वाशिम) येथील एका मुलीशी २३ एप्रिलला विवाह ठरला होता. कर्जाचा डोंगर डोक्यावर असताना स्वत:चे लग्न कसे करायचे, या चिंतेने तो ग्रस्त होता. १४ एप्रिल रोजी संदीपने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.