जाळून घेउन युवा शेतकर्याची आत्महत्या
By Admin | Updated: March 20, 2015 01:01 IST2015-03-20T01:01:31+5:302015-03-20T01:01:31+5:30
कर्जाला व नापीकीला कंटाळून मालेगाव तालुक्यातील शेतक-याने संपवली जीवनयात्रा.

जाळून घेउन युवा शेतकर्याची आत्महत्या
मालेगाव : मालेगाव तालुक्यातील केळी या गावी कर्जाला व नापीकीला कंटाळून एका युवा शेतकर्याने स्वताला जाळून घेवून आत्महत्या केल्याची घटना १६ मार्च रोजी घडली. मालेगाव पासून ३ किमी अंतरावर केळी या गावी विठ्ठल कुंडलीक वाणी वय ३५ या शेतकर्याने कर्जाला व नापीकीला कंटाळून १६ मार्चला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घरात स्वत:ला जाळून घेतले . त्याला तात्काळ मालेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान १७ मार्च रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालावली. सदर घटनेचा पंचनामा पटवारी एस.बी. आमझरे यांनी करून प्राथमिक अहवाल तहसीलदार यांचेकडे सादर केला.