महिलेची जाळून आत्महत्या

By Admin | Updated: October 14, 2016 02:16 IST2016-10-14T02:16:38+5:302016-10-14T02:16:38+5:30

महिलेने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.

Suicide of the woman burnt to death | महिलेची जाळून आत्महत्या

महिलेची जाळून आत्महत्या

पातूर,दि. १३- स्थानिक समतानगर येथील महिलेने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना १३ ऑक्टोबरचे दुपारी १२.३0 वाजताचे दरम्यान घडली.
दुर्गा रुस्तम इंगळे ( ४३ ) या आपल्या दोन मुली व एका मुलासोबत राहतात. गुरूवारी दुपारी बाहेर जाते असे आपल्या मुलीला सांगून त्या बाहेर पडल्या. समतानगर येथे आल्यानंतर नालीत स्वत:चे अंगावर रॉकेल टाकून त्यांनी पेटवून घेतले. घटनेची वार्ता पसरताच एकच गर्दी उसळली होती. मृतक ही पूर्णपणे जळाली असल्याने दोन ते तीन तास ओळख पटली नव्हती. घटनास्थळावर गर्दी दिसल्यामुळे मृतक महिलेची लहान मुलगी घटनास्थळावर पोहचली. तिने मृतदेह पाहिला असता पायातील चप्पल, हातावरील मेंदीने ओळख पटवली. मृतदेह पोस्टमार्टमकरिता अकोला येथे रवाना करण्यात आला. घटनास्थळावर ठाणेदार अनिरुद्ध अढाव, सहा. ठाणेदार कांबळे, सहा. ठाणेदार विजय महल्ले, मनोज वासाडे, हेकाँ. सोहेल खान, विनायक पवार, अमर इंगळे, गुडदे मेजर, संजय पवार यांनी भेट दिली. या प्रकरणी पातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Suicide of the woman burnt to death