तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
By Admin | Updated: February 12, 2015 01:20 IST2015-02-12T01:20:32+5:302015-02-12T01:20:32+5:30
बोरगाव मंजू पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद.

तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
बोरगाव मंजू: पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या यावलखेड येथे बुधवारी अकोला येथील २0 वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली. उमरी येथील विठ्ठलनगर भागात राहणारा निरज अनंता पळसकार बुधवारी सकाळी घरातून निघून गेला होता. रेल्वे गँगमन यांना यावलखेड परिसरात रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबत बोरगाव मंजू पोलिसांना कळविले. पोलिसांनी अवघ्या तीन तासांत मृतकाची ओळख पटविली. तो निरज असल्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात पाठविला. बोरगाव मंजू पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या युवकाने आत्महत्या का केली, हे मात्र कळू शकले नाही.