हाता येथील शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:28 IST2017-07-18T01:28:07+5:302017-07-18T01:28:07+5:30
हाता : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून हाता येथील ३५ वर्षीय शेतकऱ्याने शेगाव येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना १६ जुलै रोजी रात्री घडली.

हाता येथील शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
हाता : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून हाता येथील ३५ वर्षीय शेतकऱ्याने शेगाव येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना १६ जुलै रोजी रात्री घडली. हाता येथील विनोद रामकृष्ण कुटे यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेतीतून उत्पन्न होत नव्हते. अशातच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ६० हजार रुपये कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत विनोद कुटे यांनी शेगाव येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. आधार कार्डवरून त्यांची ओळख पटली. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा व आप्त परिवार आहे. या घटनेबाबत तलाठी धम्मपाल नकासे यांनी बाळापूर तहसीलदारांकडे अहवाल सादर केला आहे.