मूर्तिजापुरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 19:30 IST2017-09-10T19:29:37+5:302017-09-10T19:30:44+5:30
मूर्तिजापूर: स्थानिक तेलीपुरा भागातील रहिवासी असलेल्या एका २९ वर्षीय युवकाने घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना १0 सप्टेंबर रोजी पहाटे ५.३0 वाजताच्या सुमारास घडली आहे.

मूर्तिजापुरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
कमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: स्थानिक तेलीपुरा भागातील रहिवासी असलेल्या एका २९ वर्षीय युवकाने घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना १0 सप्टेंबर रोजी पहाटे ५.३0 वाजताच्या सुमारास घडली आहे.
तेलीपुरा या जुनी वस्तीच्या भागातील रहिवासी असलेला प्रवीण एकनाथराव शिरभाते (२९) या विवाहित युवकाने १0 सप्टेंबर रोजी पहाटे त्याच्या घरा तील एका खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने घरातील हलाखीच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण असा आप्त परिवार आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.