महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: July 5, 2016 01:21 IST2016-07-05T01:21:49+5:302016-07-05T01:21:49+5:30
आकोट तालुक्यातील करतवाडी येथील घटना.

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
आकोट : नजीकच्या करतवाडी येथे एका ६0 वर्षीय महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ जुलैच्या सकाळी ९ वाजता उघडकीस आली. करतवाडी येथील पार्वताबाई आग्रे या ६0 वर्षीय महिलेने घरातील छताला दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली असल्याचे राजकुमार गुलाबराव आग्रे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे. त्यावरुन ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.