विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: June 30, 2016 00:40 IST2016-06-30T00:40:26+5:302016-06-30T00:40:26+5:30
अल्पभूधारक शेतक-याच्या मुलीने ओढणीच्या साहाय्याने घेतला गळफास.

विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या
चिखली (जि. बुलडाणा): तालुक्यातील शिंदी हराळी येथील अल्पभूधाकर शेतकर्याच्या तरूण मुलीने घरातील छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. भरतसिंग रामराव सुरडकर या अल्पभूधारक शेतकर्याची मुलगी अश्विनी भरतसिंग सुरडकर (२0) ही स्थानिक ङ्म्री शिवाजी विज्ञान महाविज्ञालयात बी.एस.सी व्दितीय वर्षात शिकत होती. २८ जून रोजी तीची आई बाहेरगावी गेलेली असताना रात्री अडिच वाजेच्या सुमारास तीने घरातील छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. यावेळी घरात तिचे वडिल व भाऊ झोपलेले होते. याप्रकरणी पोलिसांनी र्मग दाखल केला आहे.