रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: November 18, 2016 02:12 IST2016-11-18T02:12:28+5:302016-11-18T02:12:28+5:30
राहत्या घरात दोरीने गळफास घेतला.

रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या
अकोला, दि. १७- बैदपुरा परिसरात राहणार्या सायकल रिक्षाचालक जाफर खान शकुर खान(४0) यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. जाफर खान हा गत काही वर्षांपासून तन्वीर खान हयात खान(३२) यांच्या घरात भाड्याने राहात होता. काही महिन्यांपासून तो काही काम करीत नसल्याने, त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते, असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.