शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: May 2, 2017 19:24 IST2017-05-02T19:24:27+5:302017-05-02T19:24:27+5:30
तेल्हारा : तालुक्यातील भांबेरी येथील २८ वर्षीय शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ मे रोजी दुपारी उघडकीस आली.

शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या
तेल्हारा : तालुक्यातील भांबेरी येथील २८ वर्षीय शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ मे रोजी दुपारी उघडकीस आली.
भांबेरी येथील राजू रमेश बोदडे याने शेतशिवारातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.