युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: February 22, 2017 02:37 IST2017-02-22T02:37:21+5:302017-02-22T02:37:21+5:30
अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथील घटना.

युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
अकोट, दि. २१- अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथील एका ३0 वर्षीय युवकाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सदर घटना २१ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.
पोलीस सूत्रानुसार, मधुकर रामराव ललवारे (३0) रा. अकोली जहागीर याने अकोली जहागीर शेत शिवारातील महल्ले यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद सुधाकर रामराव ललवारे यांनी ग्रामीण पोलिसात दिली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास एएसआय नारायण वाडेकर करीत आहेत.