शेतकरी पुत्राची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: September 17, 2015 23:39 IST2015-09-17T23:39:42+5:302015-09-17T23:39:42+5:30
कर्जापायी युवकाची आत्महत्या; पातूर तालुक्यातील घटना.

शेतकरी पुत्राची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
पातूर (अकोला): पातूरजवळील मलकापूर येथील श्रीकांत राठोड या १८ वर्षे वयाच्या शेतकरी पुत्राने शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. म्हशी चारण्यासाठी जंगलामध्ये गेलेला श्रीकांत रात्र झाली तरीदेखील घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. गुरूवारी त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. त्याच्याकडे ७ एकर शेती असून, त्यावर सावकाराचे कर्ज आहे. वडिल वृद्ध असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी श्रीकांतवरच होती.