मूर्तिजापुरात मुख्याध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: July 17, 2017 18:51 IST2017-07-17T18:51:38+5:302017-07-17T18:51:38+5:30
मूर्तिजापूर : तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भिली येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक असलेले एकनाथ घुरडे यांनी मूर्तिजापूर येथील रेल्वे उड्डाण पुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली.

मूर्तिजापुरात मुख्याध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भिली येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक असलेले एकनाथ घुरडे यांनी मूर्तिजापूर येथील रेल्वे उड्डाण पुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १७ जुलै रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील सहा शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे घुरडे यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.
एकनाथ घुरडे हे आदिवासी भागातील चिपी भिली येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काही वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत या शाळेत कार्यरत असलेल्या काही शिक्षकांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. मूर्तिजापूर शहराच्या बाहेर असलेल्या उड्डाण पुलावर घुरडे यांनी रात्री १२ वाजताच्यानंतर गळफास घेतल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. पुढील तपास पीएसआय गणेश कोथळकर, हेकॉ विश्वास गव्हाळे, संजय लहाने करीत आहेत.