विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: May 29, 2017 01:46 IST2017-05-29T01:46:45+5:302017-05-29T01:46:45+5:30
अकोला : खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील न्यू खेतान नगरातील रहिवासी एका २५ वर्षीय विवाहितेने स्वत:च्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील न्यू खेतान नगरातील रहिवासी एका २५ वर्षीय विवाहितेने स्वत:च्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.न्यू खेतान नगरातील रहिवासी दीपक पवार यांच्या पत्नी रूपाली पवार (२५) या रविवारी सायंकाळी घरी एकट्याच असताना त्यांनी घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी धाव घेतली; मात्र तोपर्यंत रूपालीचा मृत्यू झाला होता.