आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:58 IST2018-09-29T17:57:50+5:302018-09-29T17:58:28+5:30
तेल्हारा (अकोला): तालुक्यातील खापरखेड येथील आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
तेल्हारा (अकोला): तालुक्यातील खापरखेड येथील आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २९ सप्टेंबरच्या दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. अजय प्रल्हाद पवार असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.
खापरखेड येथील अजय प्रल्हाद पवार याने आपल्या राहत्या घरी शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. अजय ऊर्फ गोबू याने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याचे आई, वडील हे गावातील मामाकडे तर मोठा भाऊ आॅटो घेऊन गेला असल्याचे समजले. याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत. तो भांबेरी येथील एका विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होता. (प्रतिनिधी)