महसूल कर्मचा-याची आत्महत्या
By Admin | Updated: January 26, 2016 02:27 IST2016-01-26T02:27:34+5:302016-01-26T02:27:34+5:30
बुलडाणा येथील घटना; राहत्या घरी घेतला गळफास.

महसूल कर्मचा-याची आत्महत्या
बुलडाणा : येथील रामनगरातील रहिवासी तथा मलकापूर तहसील कार्यालयात कार्यरत रामेश्वर एकनाथ उबरहंडे (वय ३७) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. बुलडाणा तालुक्यातील पांग्री येथील रहिवासी रामेश्वर उबरहंडे बुलडाणा येथील रामनगरात राहत होते. काही वर्षापासून बुलडाणा तहसील कार्यालयात काम केल्यानंतर त्यांची बदली मलकापूर तहसील कार्यालयात करण्यात आली होती. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांपासून ते अस्वस्थ होते. आज सकाळी ते आपल्या खोलीबाहेर न आल्यामुळे घरातील सदस्यांनी खोलीचा दरवाजा तोडला. यावेळी रामेश्वर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांची घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, भाऊ, बहीण असा आप्त परिवार आहे.