हत्या की आत्महत्या?
By Admin | Updated: May 10, 2014 23:26 IST2014-05-10T23:01:47+5:302014-05-10T23:26:59+5:30
नागझरीजवळील रेल्वे रुळावर प्रेत

हत्या की आत्महत्या?
शेगाव : बहादुरा ता.बाळापूर येथील गोपाल देवराव माळी वय ३५ यांचा नागझरी पुलाजवळ रेल्वेखाली कटून दि.१0 मे च्या रात्री दरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळी आत्महत्येपुर्वी लिहलेली चिठ्ठी मिळून आली असून यामध्ये स्वत:च आत्महत्या करीत असल्याचे नमुद आहे. मात्र याठिकाणी मिळून आलेल्या एकापेक्षा जास्त वाहनांच्या टायरच्या खुणांवरुन गोपालसोबत आणखी व्यक्ती असण्याचा संशय व्यक्त होत असून गोपालच्या घातपाताचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. बहादुरा ता.बाळापूर येथील गोपाल माळी यांचे निंबा फाटा येथे वेल्डींगचे दुकान आहे. त्यांना अभिनव (६) आणि प्रणव (३) ही दोन मुले आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी ते पत्नी मुलांसह शेगाव येथे राहत होते. ९ मे २0१४ चे रात्री ८ वा. निंबा फाटा येथून शेगाव येथे गेले. नातेवाईकांच्या लग्नाकरिता त्यांनी माणिक स्टोअर्स येथून रात्री ९ वा. कपडे खरेदी केले व घरी परतले. रात्री ११ वा. दरम्यान त्यांना फोन आला व त्यांनी मनोहर सगणे निंबी हे रक्कम घेऊन रेल्वे स्टेशन येत असून मी त्यांना घेण्यासाठी जात असल्याचे पत्नीला सांगितले. व घरुन निघून गेले. रात्री १२ वाजेपर्यंत पती घरी न परतल्यामुळे व फोन घेत नसल्यामुळे त्यांनी गोपाल यांचे मोठे भाऊ विनायक माळी यांना फोन लावला. त्यांनीही गोपालच्या मोबाईलवर फोन लावला. मात्र उत्तर येत नव्हते. मोबाईल खणखणत होता. त्यामुळे त्यांना शोधाशोध सुरु होती. मात्र गोपालने पत्नीला घरुन जाण्याचे कारण खोटे सांगीतले होते. जो व्यक्ती रक्कम घेऊन येणार होता तो विनायक माळी यांचे सोबत होता. यावरुन गोपालला रात्री ११ वा. दरम्यान आलेला शेवटचा फोन करणारी व्यक्ती कोण? हा प्रश्न उपस्थित आहे. व त्या फोननंतर गोपाल बेचैन असल्याचे व घाईने घरुन गेल्याचे त्यांचे पत्नीने सांगीतले. घटनास्थळावर गोपालची दुचाकी क्रं.एम.एच.३0 ए.ई.३५३६ आढळून आली. मात्र या दुचाकीसोबतच इतर दुचाकीच्या टायरचे व्रणही दिसतात. यावरुन गोपाल सोबत आणखी कोणी व्यक्ती असण्याचा संशय व्यक्त होत आहे. तसेच गोपालला आत्महत्याच करायची होती तर त्याने शेगाव पासून ७ ते ८ कि.मी. लांब आडवळणाचे ठिकाणीच का निवडले? रात्री ११ वा. फोन करुन गोपालला बोलावणारी व्यक्ती कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होत असून मनमिळावू व सोज्वळ स्वभावाच्या गोपालचे कुणासोबतही वाद नसल्याचे त्याचे नातेवाईकांनी सांगितले. १0 मे २0१४ चे रात्री दरम्यान नागझरी पुलाजवळ डाऊन ट्रॅक्टरवर एक ईसम कटून मृत्यू पावल्याची फिर्याद रेल्वे ट्रॅकमन राहुल वानखडे यांनी उरळ पोलिसात दिली. यावरुन पोलिसांनी र्मग दाखल केला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक आत्माराम इंगोले, पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले. शव विच्छेदनानंतर बहादुरा ता.बाळापूर येथे गोपालवर दु:खद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.