अल्पभूधारक शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: April 22, 2017 01:26 IST2017-04-22T01:26:10+5:302017-04-22T01:26:10+5:30
आलेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी विनोद दत्तात्रय महल्ले (४२) यांनी सततची नापिकी व बँकेच्या कार्जाला कंटाळून २१ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या के ली.

अल्पभूधारक शेतक-याची आत्महत्या
आलेगाव (जि. अकोला) : येथील अल्पभूधारक शेतकरी विनोद दत्तात्रय महल्ले (४२) यांनी सततची नापिकी व बँकेच्या कार्जाला कंटाळून २१ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या के ली.
आलेगाव येथील रहिवासी विनोद दत्तात्रय महल्ले यांचे गोळेगाव शेतशिवारात पाच एकर कोरडवाहू शेत आहे. शेतात होत असलेली सततची नापिकी व ग्रामीण बँकेचे असलेले कर्ज व जवळच येऊन ठेपलेली खरीप पेरणी याची त्यांना चिंता होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई व भाऊ असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयावर मोठा संकटाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.