विवाहितेची विष प्राशन करुन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 00:15 IST2016-08-02T00:15:03+5:302016-08-02T00:15:03+5:30
नांदुरा तालुक्यातील घटना; पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल.

विवाहितेची विष प्राशन करुन आत्महत्या
नांदुरा (जि. बुलडाणा) : सासरकडून होणार्या छळाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ३१ जुलै रोजी तालुक्यातील वडनेर भोलजी येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना सोमवारी अटक केली.
तालुक्यातील वडनेर भोलजी येथील कविता निखील वानखडे वय २0 या विवाहितेने ३१ जुलै रोजी दुपारी घरी विषारी औषध प्राशन केले. विवाहितेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सासू, सासरा, दीर व नणंद यांच्यांकडून माहेरकरुन २0 हजार रुपये आणण्यासाठी शारीरिक व मानसीक छळ केला गेला असल्याचे नमूद केले आहे.
याप्रकरणी मृतक विवाहितेच्या आईने नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मृतक महिलेचा सासरा लक्ष्मण वानखडे, सासु सुशिलाबाई वानखडे, दीर दीपक वानखडे आणि ज्योती वानखडे व शितल वानखडे यांच्या विरुध्द कलम ३0६, ४९८, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.