कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: July 6, 2015 01:54 IST2015-07-06T01:54:43+5:302015-07-06T01:54:43+5:30

अकोला जिल्ह्यातील घटना; पहिल्या पत्नीनेही केली होती आत्महत्या.

Suicide of Debt Farmer | कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

देऊळगाव (जि. अकोला ): सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे पातूर तालुक्यातील देऊळगाव येथील शेतकर्‍याने शनिवारी रात्री आत्महत्या केली. हरिहर काशीराम कराळे (वय ४0) हे जीवन संपविलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. नऊ महिन्यांपूर्वी त्यांची पहिली पत्नी सिमा हिने आत्महत्या केली होती. त्या ग्रामपंचायत सदस्या होत्या. पातूरपासून ६ कि.मी. असलेल्या देऊळगाव येथील अल्पभूधाकर शेतकरी हरिहर कराळे यांच्यावर राष्ट्रीयीकृत बॅँकेचे कर्ज होते. त्यांनी शनिवारी रात्री राहत्या घरात विष प्राशन केले. त्यांना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यापश्‍चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पहिल्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले होते.

Web Title: Suicide of Debt Farmer