अकोला - एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी रोडवर एका ३० वर्षीय युवकाने गळफास लाउन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे उजेडात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.बाळापुर तालुक्यातील अंदुरा येथील मुळचा रहिवासी असलेला व आता कामानीमीत्त कुंभारी येथील मराठा नगरात वास्तव्य असलेल्या नागेश हरीनाथ पारसकर (३०) या युवकाने कुंभारी रोडवरील सोनटक्के कॉलेजजवळ असलेल्या एका कडूनिंबाच्या झाडाला गळफास लाउन आत्महत्या केली. निंबाच्या झाडाला एका युवकाचा मृतदेह लटकलेला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवीला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.
युवकाची गळफास लाउन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 14:56 IST
अकोला - एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी रोडवर एका ३० वर्षीय युवकाने गळफास लाउन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे उजेडात आली.
युवकाची गळफास लाउन आत्महत्या
ठळक मुद्दे नागेश हरीनाथ पारसकर (३०) या युवकाने कुंभारी रोडवरील सोनटक्के कॉलेजजवळ असलेल्या एका कडूनिंबाच्या झाडाला गळफास लाउन आत्महत्या केली. झाडाला एका युवकाचा मृतदेह लटकलेला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवीला.