दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By Admin | Updated: March 9, 2017 03:42 IST2017-03-09T03:42:06+5:302017-03-09T03:42:06+5:30

बाळापूर येथील घटना; मराठी विषयाचा पेपर चांगला गेला नसल्यामुळे केली आत्महत्या.

Suicide of Class 10 student | दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

बाळापूर(जि. अकोला), दि. ८- बाळापूर येथील एका दहाव्या वर्गात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीने ८ मार्च रोजी मानसिक तणावामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळापूर शहरातील जैन मंदिराजवळील तेजश्री गणेश भाजीपाले ही १६ वर्षीय विद्यार्थिनी स्थानिक जनाबाई विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होती. तिची दहावीची परीक्षा सुरू असून, त्यात मराठी विषयाचा पेपर चांगला गेला नसल्याच्या मानसिक तणावातून बुधवारी घरात गळफास लावून आत्महत्या केली. बाळापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठविला होता.

Web Title: Suicide of Class 10 student