सेल्फी काढून युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: July 27, 2016 00:06 IST2016-07-27T00:06:36+5:302016-07-27T00:06:36+5:30
मेहकर तालुक्यातील परतापूर येथील घटना; खासगी दवाखान्यात घेतला गळफास.

सेल्फी काढून युवकाची आत्महत्या
मेहकर (जि. बुलडाणा): तालुक्यातील परतापूर येथील एका युवकाने येथील खासगी रुग्णालयात गळ्याला फास लावल्याची सेल्फी काढली. सेल्फी मोठय़ा भावाला पाठविल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ जुलै रोजी दुपारी घडली.
मनोहर लक्ष्मण शिंदे (वय २३) रा. परतापूर, ता. मेहकर येथील डॉ. जोशी यांच्या रुग्णालयात गत पाच वर्षांपासून नोकरी करीत होता. मंगळवारी मनोहरने या दवाखान्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी मनोहर शिंदे याने मोबाइलवर सेल्फी काढून तसा फोटो पाठविला होता. यासोबतच त्याने आई - वडिलांच्या नावे एक कविता केली असून, काही चिठ्ठय़ाही लिहिल्या आहेत; मात्र या चिठ्ठीत त्याने आत्महत्येबाबत काहीही लिहिले नाही. शिवाजी लक्ष्मण शिंदे (वय २७) रा.परतापूर याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.