कोरोना सवलतीत तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:31 IST2020-12-05T04:31:32+5:302020-12-05T04:31:32+5:30
नागोरावच्या पत्नीने गतवर्षी आत्महत्या केली. वडील नागोराव यांच्या त्रासामुळेच आईने आपली जीवनयात्रा संपविल्याची तक्रार मुलांनी पोलिसात केली. याप्रकरणी बाभूळगाव ...

कोरोना सवलतीत तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीची आत्महत्या
नागोरावच्या पत्नीने गतवर्षी आत्महत्या केली. वडील नागोराव यांच्या त्रासामुळेच आईने आपली जीवनयात्रा संपविल्याची तक्रार मुलांनी पोलिसात केली. याप्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी नागोरावला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो जिल्हा कारागृहात होता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोपींना सोडण्यात आले. यात नागोरावचाही समावेश होता.
मागील दोन दिवसांपासून नागोराव बेपत्ता होता. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह गावशिवारात असलेल्या एका शेतात आढळला. कोरोनाचा प्रकोप कमी होताच पुन्हा तुरुंगात जावे लागेल ही चिंता नागोरावला होती. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.