देउळगाव येथे ऊसाला आग; हजारो रुपयांचे नुकसान
By Admin | Updated: April 4, 2017 16:16 IST2017-04-04T16:05:10+5:302017-04-04T16:16:19+5:30
पातूर तालुक्यातील घटना; ऊस जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान

देउळगाव येथे ऊसाला आग; हजारो रुपयांचे नुकसान
पातूर : तालुक्यातील देउळगाव येथील शेतक-याच्या ऊसाला आग लागल्याची घटना ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता घडली. देउळगाव येथील विजयसिंग चव्हाण यांच्या तिन एकरात उस पेरलेला आहे. या उसाला मंगळवारी अचानक आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.