अचानक सरकीचे दर कोसळले, रुईचे उत्पादन वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 01:05 IST2017-05-15T01:05:04+5:302017-05-15T01:05:04+5:30
अकोला: सरकीचे दर अचानक कोसळले असून, त्याचा परिणाम कापूस दरावर झाला आहे. मागील महिन्यात सरकीचे दर हे प्रतिक्विंटल २ हजार ६०० रुपयांवर गेले होते ते आजमितीस ५०० रुपयाने घटले आहेत.

अचानक सरकीचे दर कोसळले, रुईचे उत्पादन वाढले!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सरकीचे दर अचानक कोसळले असून, त्याचा परिणाम कापूस दरावर झाला आहे. मागील महिन्यात सरकीचे दर हे प्रतिक्विंटल २ हजार ६०० रुपयांवर गेले होते ते आजमितीस ५०० रुपयाने घटले आहेत. रुईचे उत्पादन मात्र बऱ्यापैकी झाले आहे.सरकीचे उत्पादन हे कापसाच्या उत्पादनावर अवलंबून असते. मागील वर्षीच्या खरीप हंगामात देशात कापसाचे उत्पादन हे ३५१ लाख गाठी एवढे झाले आहे. रुईची उत्पादन मात्र ५६८ किलो प्रतिहेक्टर आहे. महाराष्ट्रात हेच उत्पादन ८९ लाख गाठी एवढे झाले आहे. महाराष्ट्रातील कापसापासून निघणाऱ्या रुईची उत्पादकता हेक्टरी ३९८ किलो आहे. विदर्भातील १४.५० लाख हेक्टर क्षेत्रावर २८ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. रुईची उत्पादकता प्रतिहेक्टर ३२८ किलोग्रॅम आहे. रुईचे उत्पादन वाढल्याने सरकीचेही उत्पादन वाढले आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम सरकीच्या दरावर झाल्याचे वृत्त आहे; पण सरकीचा वापर काही प्रमाणात खाद्य तेलातही केला जातो आणि पशुखाद्यही तयार केले जाते. असे असताना सरकीचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मागील महिन्यात कापसाला मिळणारे समाधानकारक दर कमी झाल्यानंतर आता सरकीचे दर कोसळले आहेत.
सरकीचे दर बाजारात कोसळले आहेत. त्याचा एकूण कापूस दरावरही परिणाम होत आहे. मागील महिन्यात २,६०० रुपये प्रतिक्विंटल सरकी होती ती आजमितीस २,१०० रुपयांवर येऊन ठेपली आहे.
-बसंत बाछुका,कापूस उद्योजक, अकोला.