सरकीपाठोपाठ ढेपेचे भाव पाचशेने उतरले

By Admin | Updated: May 18, 2017 14:38 IST2017-05-18T14:38:45+5:302017-05-18T14:38:45+5:30

ढेपेचे भाव अचानक उतरल्याने पशुपालक सुखावले आहेत तर व्यापार्‍यांना मात्र या घसरणीचा लाखो रुपयांनी फटका बसला आहे.

Suddenly, the price has dropped by five hundred rupees | सरकीपाठोपाठ ढेपेचे भाव पाचशेने उतरले

सरकीपाठोपाठ ढेपेचे भाव पाचशेने उतरले

अकोला: कॉटन सरकीपाठोपाठ ढेपेचेही भाव क्विंटलमागे पाचशे रुपयांनी उतरल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. ढेपेचे भाव अचानक उतरल्याने पशुपालक सुखावले आहेत तर व्यापार्‍यांना मात्र या घसरणीचा लाखो रुपयांनी फटका बसला आहे.
अकोला जिल्हा आणि आजूबाजूचा परिसर कापूस पेर्‍याचा म्हणून ओळखला जातो. कापूस पिकविणार्‍या या परिसरात सरकी आणि ढेपेचीदेखील मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. ढेपेचे भावही अकोल्यातून उघडले जातात. मध्यंतरी सरकीचे भाव वधारले त्यामुळे कापूस सरकीपासून तयार होणार्‍या ढेपेचे भावही चढले होते. सरकीचे भाव वाढल्याने पशुपालक त्रस्त झाले होते. त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावरही पडला होता. दरम्यान, काही दिवसात सरकीचे भाव कमी झाल्याने ढेपेचे भावही घसरले. सरकीचे भाव २,६00 ते २,७00 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. ते घसरून आता एकविसशे रुपयांवर स्थिरावले आहेत. सरकीचे भाव खाली उतरताच सरकीपासून तयार होणारी ढेपही खाली उतरली आहे. ढेपचे भाव २,३00 रुपयांपर्यंत पोहोचले होते. ते आता खाली उतरत १८00-१९00 रुपये क्विंटलपर्यंत आले आहे. ढेपेचे भाव खाली उतरताच, त्रस्त झालेल्या पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. किमान पाचशे रुपयांनी ढेपचे भाव उतरल्याने पशुपालक सुखावला आहे. एकीकडे पशुपालक सुखावला असला तरी ढेप विक्री करणारा व्यापारी; मात्र दुखावला गेला आहे. ढेपेच्या भाववाढीच्या दृष्टीने ज्या व्यापार्‍यांनी ढेपेचा साठा जमवून ठेवला होता. त्या व्यापार्‍यांना घसरलेल्या ढेपेच्या भावाने लाखोंचा फटका बसला आहे. अकोल्यातील अनेक व्यापार्‍यांना ढेपेच्या भाव घसरणीमुळे लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. क्विंटलमागे पाचशे रुपयांची तफावत प्रथमच समोर आल्याने अनेकांचे कंबरडे मोडले आहे.

Web Title: Suddenly, the price has dropped by five hundred rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.