चहाचा घोट घेण्याआधीच महिलेचा आकस्मिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2022 19:04 IST2022-07-27T19:04:41+5:302022-07-27T19:04:46+5:30
Murtijapur News: दिपाली देवराज पवार असे मृतक महिलेचे नाव आहे.

चहाचा घोट घेण्याआधीच महिलेचा आकस्मिक मृत्यू
मूर्तिजापूर : तालुक्यातील सेलू नजीक येथील २१ वर्षिय महिला आपल्या २ महिन्याच्या बाळाला एका खासगी रुग्णालयात उपचार्थ दाखल केले. ती बाळाला घेऊन चहा घेण्यासाठी चहा टपरीवर आली असता तिच्या हातात चहाचा कप जाईपर्यंत ती भोवळ येऊन जागीच कोसळून तीचा मृत्यू झाल्याची घटना येथील शासकीय रुग्णालयाजवळ २७ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान घडली. दिपाली देवराज पवार असे मृतक महिलेचे नाव आहे.
शेलू नजीक येथील दिपाली देवराज पवार (२१) ही महिला, येथील रुग्णालयात २२ जुलै पासून तिच्या २ महिन्याच्या बाळाच्या उपचारासाठी मुक्कामी होती दरम्यान २७ जुलै रोजी बाळाला घेऊन सदर महिला स्वतःच्या उपचारासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात जाते, असे बाळाचा उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांना सांगून ती सरकारी रुग्णालयाजवळ असलेल्या चहा टपरीवर चहा घेण्यासाठी थांबली असता, कडेवरील आजारी बाळाला घेऊन ती जमीनीवर कोसळली त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.