अकोल्यात मोबाइलचा अचानक स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:24 IST2018-09-11T17:58:34+5:302018-09-11T18:24:44+5:30
रेड मी एमआय ए-१ या मोबाइलचा अचानक स्फोट झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी टिळक रोडवर घडली.

अकोल्यात मोबाइलचा अचानक स्फोट
अकोला : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसो बु. रहिवासी असलेल्या एका युवकाच्या मोबाइलचा अचानक स्फोट झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी टिळक रोडवर घडली. मोबाइलचा स्फोट झाल्याने या परिसरात खळबळ उडाली होती.
पळसो बु. येथील रहिवासी परमेश्वर पवार हे जिल्हा उद्योग केंद्रात कामानिमित्त आले होते. यावेळी त्यांच्या खिशातील मोबाइल गरम होत असल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर पवार यांनी मोबाइल उघडा करून ठेवला. मात्र, बॅटरी गरम होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर त्यांनी घाबरून मोबाइल एका ठिकाणावर ठेवला असता त्यामधून धूर बाहेर आला व काही क्षणातच मोबाइलचा स्फोट झाला. मोबाइलच्या स्फोटाचे नेमके कारण समजले नाही. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पवार यांच्याकडून माहिती घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.