पाणीटंचाइ निवारणाचा कृती आराखडा तातडीने सादर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:18 AM2021-01-22T04:18:04+5:302021-01-22T04:18:04+5:30

अकोला: जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तातडीने तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी ...

Submit water scarcity action plan immediately! | पाणीटंचाइ निवारणाचा कृती आराखडा तातडीने सादर करा!

पाणीटंचाइ निवारणाचा कृती आराखडा तातडीने सादर करा!

Next

अकोला: जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तातडीने तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत गुरुवारी देण्यात आले.

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या मुद्यावर सभेत चर्चा करण्यात आली. तसेच पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या कालावधीसाठी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तातडीने तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सभेत देण्यात आले. कूपनलिका व विंधन विहिरींच्या कामांसाठी २०० फूट खोलीकरणाच्या कामांसाठी परवानगी आहे; मात्र पाणीपातळी खोल गेलेल्या भागात कूपनलिका व विंधन विहिरींच्या कामांसाठी ३०० फूट खोलीकरणाच्या कामांकरिता परवानगी मिळावी, यासाठी शासनाच्या संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना या सभेत देण्यात आल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष सावित्री राठोड, शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, महिला व बालकल्याण सभापती मनिषा बोर्डे यांच्यासह समितीचे सदस्य अप्पू तिडके, मीरा पाचपोर, संजय अढाऊ यांच्यासह जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा व लघुसिंचन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Submit water scarcity action plan immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.