‘त्या’ शाखा अभियंत्याविरुद्धच्या तक्रारींची माहिती सादर करा!

By Admin | Updated: August 30, 2014 01:08 IST2014-08-30T01:01:40+5:302014-08-30T01:08:04+5:30

अकोला जिल्हा परिषद ‘डीसीईओं’चे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या क र्मचार्‍या विरूद्ध तक्रार सादर करण्याचे निर्देश

Submit information about 'those' branch engineers' complaints! | ‘त्या’ शाखा अभियंत्याविरुद्धच्या तक्रारींची माहिती सादर करा!

‘त्या’ शाखा अभियंत्याविरुद्धच्या तक्रारींची माहिती सादर करा!

अकोला : भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या मूर्तिजापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता पी.आर. रणबावरे यांच्याविरुद्ध प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी (डीसीईओ) शुक्रवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे हे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत मूर्तिजापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता रणबावरे यांनी मुलाच्या नावाने निविदा काढून व त्याला कामे देऊन कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप गत २२ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला होता. तसेच रणबावरे यांच्या कार्यालयीन कामकाजाबाबत अनेक तक्रारी असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यानुषंगाने शाखा अभियंता रणबावरे यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीदेखील स्थायी समितीच्या सभेत गठित करण्यात आली होती. या पृष्ठभूमीवर रणबावरे यांच्याविरुद्ध प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे दिले.

Web Title: Submit information about 'those' branch engineers' complaints!