तिसऱ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:11+5:302021-07-02T04:14:11+5:30

अकोला : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील मूर्तिजापूर ...

Submit a candidature application on the third day! | तिसऱ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल !

तिसऱ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल !

अकोला : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या एका गटासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या १४ आणि सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २९ जूनपासून सुरू झाली आहे. त्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी १ जुलै रोजी जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या लाखपुरी गटातून एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या दोन, तीन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता उमेदवारांची गर्दी होणार आहे.

Web Title: Submit a candidature application on the third day!