उपजिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण यंत्र कायमस्वरूपी बंद
By Admin | Updated: September 21, 2015 01:39 IST2015-09-21T01:39:15+5:302015-09-21T01:39:15+5:30
दुरुस्तीचा खर्च हा यंत्राच्या मूळ किमतीच्या जास्त येत असल्याने क्ष-किरण यंत्र कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय.

उपजिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण यंत्र कायमस्वरूपी बंद
अकोला- मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण यंत्र कायम स्वरुपी बंद करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयाने एप्रिल २0१५ मध्ये हे यंत्र निर्लेखित करण्याचा प्रस्ताव आरोग्य सहसंचालकांकडे पाठविला होता. वर्षभरापासून हे यंत्र होते. यंत्राचा दुरुस्तीचा खर्च हा यंत्राच्या मूळ किमतीच्या ५0 पेक्षा अधिक येत असल्याने आणि सुटे भाग मिळत नसल्याने यंत्र कायम स्वरुपी बंद करण्याची परवानगी आयोग्य सहसंचालकांनी १९ सप्टेंबर रोजी दिले. जुने यंत्र निर्लेखित कण्याची परवानी मिळाल्याने आता मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात नवीन यंत्र बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.