एअर कॉम्प्रेसर पार्श्वभागावर लावल्याने फुगले मजुराचे पोट

By Admin | Updated: May 16, 2017 02:13 IST2017-05-16T02:13:23+5:302017-05-16T02:13:23+5:30

मस्करी आली अंगलट: एमआयडीसीतील दालमिलमधील प्रकार

Stuffed laborer stomach due to air compressor on the ground | एअर कॉम्प्रेसर पार्श्वभागावर लावल्याने फुगले मजुराचे पोट

एअर कॉम्प्रेसर पार्श्वभागावर लावल्याने फुगले मजुराचे पोट

सचिन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: औद्योगिक वसाहतमधील एका दालमिलमधील मजूर काम आटोपल्यानंतर एअर कॉम्प्रेसरद्वारे अंगावरील आणि कपड्यांवरील धूळ काढत असताना एका मजुराने मस्करी म्हणून अविनाश नामक मजुराच्या पार्श्वभागात एअर कॉम्प्रेसर लावल्याने सदर मजुराच्या पोटात हवा जाऊन त्याचे पोट फुगल्याचा प्रकार रविवारी घडला. पोट फुगल्याने घाबरलेल्या मजुराला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
औद्योगिक वसाहतमधील एका दालमिलमध्ये रविवारी मजुरांचे काम आटोपले होते. दररोजप्रमाणेच अंगावरील आणि कापडांवर असलेला धूळ काढण्यासाठी त्यांनी रविवारी सायंकाळी एअर कॉम्प्रेसरचा वापर केला.
पाच ते सहा मजूर एअर कॉम्प्रेसरद्वारे धूळ काढत असतानाच एका मजुराने अविनाश नामक मजुराच्या पार्श्वभागाला एअर कॉम्प्रेसर लावून मस्करी करण्याचा प्रयत्न केला; मात्र पार्श्वभागाद्वारे एअर कॉम्प्रेसरची हवा सदर मजुराच्या पोटात गेल्याने त्याचे पोट प्रचंड फुगले, हा प्रकार पाहून उपस्थित मजुरांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी अविनाशला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रविवारी रात्री अविनाशच्या पोटावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर सोमवारी सकाळी अविनाशचे पोट पूर्वीप्रमाणे सामान्य झाले; मात्र मस्करी म्हणून केलेला प्रकार अविनाशच्या जिवावर बेतणारा होता.
तर असा प्रकार करणारे मजूरही अद्यापही घाबरलेले आहेत, कारण सोमवारी दिवसभर अविनाश हा बेशुद्धावस्थेत असल्याने मंगळवारी अविनाश या मजुराचे एमआयडीसी पोलीस बयान नोंदविणार असल्याची माहिती आहे.

मस्करी करा जरा सांभाळून
मित्रांमध्ये असताना किंवा कौटुंबिक वातावरणामध्ये विविध प्रकारे मस्करी करण्यात येते; मात्र रविवारी एमआयडीसीत घडलेला प्रकार हा डोळे उघडणारा असून, बोलण्याव्यतिरिक्त करण्यात येत असलेली मस्करी जरा सांभाळून करा, अशी माहिती सदर डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. शरीरासोबत करण्यात येणारी मस्करी ही अंगावर बेतणारी असल्याने प्रत्येकाने अशा प्रकारची मस्करी करणे टाळावे किंवा सांभाळून हे प्रकार करावेत.

मजुरावर यशस्वी शस्त्रक्रिया
अविनाश नामक मजुरावर खासगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सदर मजुराचे पोट आता पूर्वीप्रमाणे झाले आहे; मात्र सोमवारी रात्री उशिरापर्यंत मजूर बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे मंगळवारी सदर मुजराचे बयान नोंदवून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Stuffed laborer stomach due to air compressor on the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.